बंडारु दत्तात्रय यांचा राजीनामा; मंत्रीमंडळात रविवारी सकाळी होणार फेरबदल

0
15
नवी दिल्ली,दि.01(वृत्तसंस्था) – केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर बंडारु दत्तात्रय यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. वृत्तसंस्थांनी अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की मोदींच्या चीन दौऱ्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अशी शक्यता होती की 2 सप्टेंबर रोजी फेरबदल होतील. मात्र आता याची तारीख आणि वेळ निश्चित झाली आहे. 3 सप्टेंबर रोजी मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना होणार आहे. त्याआधी सकाळी मंत्र्यांचा शपथविधी होईल. 10 ते 12 मंत्र्यांची सुट्टी करुन त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे. 18 ते 30 मंत्र्यांचे खाते बदलले जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात रेल्वे मंत्रालयात खांदेपालट होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. सुरेश प्रभुंकडील रेल्वे मंत्रालय नितीन गडकरींना मिळण्याची माहिती आहे.
 मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उमा भारती, राजीव प्रताप रुडी यांच्यासह सहा वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामे सादर केले होते. दरम्यान, रुडी शुक्रवारी म्हणाले, माझा राजीनामा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. तर, उमा यांनी राजीनाम्यावर काहीही न बोलण्याची पवित्रा घेतला. त्या म्हणाल्या मी काही ऐकले नाही, मी काही बोलणार नाही.
ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होऊन गेल्या तेथील मंत्र्यांना कमी करुन ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे त्या राज्यातील मंत्री केले जातील. जे मंत्री कार्यक्षम नव्हते त्यांना   वगळले जाईल. जे लोक मंत्रिमंडळापेक्षा संघटनेसाठी अधिक फायद्याचे आहे त्यांना पक्षाच्या कामासाठी परत बोलावले जाईल.
गुरुवारी उमा भारती, रुडी यांच्यासह सहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात कलराज मिश्र, संजीव बाल्यान, महेंद्रनाथ पांड्ये आणि निर्मला सीतारामण यांचा समावेश आहे.
 रेल्वे मंत्रालयात काही फेरबदल होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरेश प्रभू यांच्याकडून हे खाते काढून नितीन गडकरींना दिले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक रेल्वे अपघात झाले. पाच दिवसांत दोन अपघात झाल्यानंतर प्रभूंनी मोदींची भेट घेऊन राजीनाम्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे या फेरबदलात त्यांच्याकडील खाते काढले जाते का हे पाहावे लागेल. प्रभू किंवा विनय सहस्त्रबुद्धे यांना पर्यावरण खाते दिले जाऊ शकते.