देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं पंतप्रधान मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे करणार भूमिपूजन

0
12

अहमदाबाद, दि. 14 – मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारतात दाखल झाले आहेत. आज साबरमतीमध्ये या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.  ५०८ किमीचा मार्ग असलेला हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ७०० हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून ७ किमी समुद्राखालून ही रेल्वे धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून १५ किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे. 1.08 लाख कोटी रुपये खर्च असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचे कर्ज दिले आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. एचएसआरसीचे अधिकारी हा प्रस्तावित मार्ग असल्याचे सांगत असले, तरी याला मंजुरी मिळणे ही औपचारिकता आहे. या मार्गाचे हवाई आणि भूभौतिक सर्वेक्षण झाले आहे. त्यानंतर, वाशी ते ठाणे हा मार्ग पाण्याखालून करण्यात यावा, असा निर्णय झाला.साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला फुले अर्पण केली आणि नरेंद्र मोदी यांच्यासमवेत शहरातील 16 व्या शतकातील मशिदीलाही भेट दिली.