मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद, लँडिंग करताना घसरलं स्पाईस जेटचे विमान

0
10

मुंबई, दि. 20 – मुंबईत मंगळवारी (19 सप्टेंबर) दुपारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे मुंबई विमानतळाची  मुख्य धावपट्टी बंद आहे. रनवे 14, रनवे 32वरुन विमानाचे उड्डाण आणि लँडीग सुरु आहे. पण सोसाटयाच्या वा-यामुळे हवाई वाहतुकीचा वेग मंदावला आहे. काल संध्याकाळपासून एकूण 56 विमाने दुस-या विमानतळांकडे वळवण्यात आली. पावसाचा जोर आणि धावपट्टीवर पाणी असल्यामुळे काल स्पाईस जेटचे बोईंग 737 लँडीग करताना धावपट्टीवरुन घसरले. सुदैवाने यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नाही. काल दृश्यमानात कमी झाल्यामुळे  6.50 ते 7.16 दरम्यान मुंबई विमानतळावर हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती.