नक्षल्यांनी वाहने जाळली

0
12

गडचिरोली, ता.२३-सशस्त्र नक्षल्यांनी काल गुरुवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कामावरील जवळपास १५ वाहनांना आग लावल्याची घटना धानोरा तालुक्यातील पुस्टोला-गरंजी मार्गावर घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
हैदराबाद येथील सरला कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे पुस्टोला-गरंजी रस्त्याचे करण्यात येत आहे. जेसीबी, टॅक्टर, ट्रक,, रोलर व अन्य साहित्याने काम करीत असताना काल ५० ते६० सशस्त्र नक्षल्यांनी कामावर येऊन मजुरांना धमकावले. त्यानंतर त्यांनी २ जेसीबी, २ ट्रक, ८ टॅक्टर, १ पिकअप व २ अन्य वाहनांतील डिझेल काढून वाहनांना आग लावली. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.