ग्रामपंचायत निवडणुकीत सुमारे २० लाखाचा घोटाळा

0
13
आरटीआय कार्यकर्ते सुरेश दुरुगकर यांची तिरोडा पोलिसात तक्रार
तहसिलदार डहाट व चव्हाण यांची तक्रार
गोंदिया,दि.२७(बेरार टाईम्स विशेष)-राज्यसरकार कुठल्याही निवडणुका असल्या की त्या निवडणुकीच्या प्रकिया काळातील सर्व व्यवहारासाठी शासकिय निधी उपलब्ध करुन देते.त्यांनुसार जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका सन २०१०-२०१४ करीता खर्च भागविण्यासाठी लेखाशिर्ष २०५३०५४७ ग्रामपंचायत १३ कार्यालयीन खर्चनुसार ३२ लाख एकोणचाळीस हजार नऊशे एक रुपये(३२३९९०१) चा निधी देण्यात आले होते.त्या निधीपैकी सुमारे २० लाख ७० हजार ५५० रुपयाच्या निधीची अफरातफर करुन शासकिय निधीचा अपहार केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश दुरुगकर यांनी केला आहे.त्यासंबधी दुरुगकर यांनी तिरोडा पोलिस ठाणे येथे ११ जुर्ले २०१७ रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे.त्या तक्रारीला चार महिने लोटले असून अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.त्यामुळे याप्रकरणातील संशयीत अधिकाèयांवर कारवाई होऊ शकलेली नाही.
पोलिस ठाणे तिरोडाला दिलेल्या तक्रारीत खोटे शिके,कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांची बनावट स्वाक्षरी करुन २० लाख रुपयाचे देयके हडप करण्यामध्ये तिरोड्याचे तत्कालीन व गोरेगावचे विद्यमान तहसिलदार कल्याणकुमार डहाट,गोंदियाचे विद्यमान तहसिलदार रविंद्र चव्हाण,तिरोड्याचे नायब तहसिलदार आर.डी.पटले,कनिष्ठ लिपिक योगेश राठोड व दिलीप राऊत तसेच पुर्वीचे संबधित अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
तक्रारीत सन २०१० आणि २०१२ यावर्षी तिरोडा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या.त्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी शासनाकडून तिरोडा महसुल विभागाला ३२ लाख ३९ हजार ९०१ रुपये अनुदान देण्यात आले.ते २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात उपकोषागार कार्यालय तिरोडा येथून उचल करण्यात आले.परंतु त्या निवडणुक काळात कर्तव्यावर हजर असलेल्या शासकीय कर्मचाèयांना,पोलिसांना,सैqनकाना तसेच ग्रामपंचायतींना नियमाप्रमाणे देय असलेली रक्कम देण्यात आली नाही.तसेच निवडणुकाला उपयोगी पडणारे साहित्य खरेदीचे खोटे व बनावट देयके सादर करुन रक्कमेची उचल केल्याचे म्हटले आहे.या तक्रारीतील गैरअर्जदार अधिकाèयांनी संगनमत करुन शासकीय मालमत्ता व अनुदान कर्तव्य पार पाडणाèयांना न देता त्यांचे आर्थिक नुकसान केल्यासंबधीचे पुरावे असल्याने कलम ४०६,४०९,३४ भांदवीनुसार कारवाईची मागणी दुरुगकर यांनी केली आहे.परंतु त्या तक्रारीवर अद्यापही अधिकृत गुन्ह्याची नोंद झालेली नसल्याचे दुरुगकर यांचे म्हणने आहे.
यासंदर्भात या अपहारप्रकरणाची चौकशी करणारे तिरोडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक संदिप कोळी यांना विचारणा केली असता त्यांनी तिरोडा तहसिल कार्यालयातून एक कागद अद्याप मिळाले नसल्याने ही चौकशी पुर्ण होऊ शकलेली नाही.येत्या दोन चार दिवसात सदर चौकशी पुर्ण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.