प्रो. साईबाबांच्या जामीनावर 6 डिसेंबरला हाेणार सुनावणी

0
7
नागपूर,दि.09 – माओवाद्यांचा समर्थक प्रो. जी. एन. साईबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात ६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे बाजू मांडणार आहेत.
न्यायालयाने ६ डिसेंबरला या अर्जावर सुनावणी ठेवली आहे. प्रो. साईबाबा आणि त्याचे सहकारी महेश तिर्की, पांडू नरोटे, हेम मिश्रा आणि प्रशांत राही या पाच जणांना गडचिरोली जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मार्च महिन्यात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्वच आरोपी हे प्रतिबंधित सीपीआय माओवादी या संघटनेचे सक्रीय सदस्य असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले होते. या शिक्षेला सर्व जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आमचा कुठल्याही हिंसक कारवायांमध्ये सहभाग नसून केवळ माओवादी साहित्य बाळगणे हा गुन्हा नाही, असा आरोपींचा दावा आहे.