गोंदियात कडकडीत बंद;भीमा कोरेगाव घटनेचा निषेध

0
10

गोंदिया,दि.03ः सणसवाडी हिंसाचार हाताळण्यास गृह विभागाने कसूर केली असून, पोलिसांनी या प्रकरणात अक्षम्य हेळसांड केल्याचा आरोप भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी करीत या घटनेमागे शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि मांजरीतील घुगे यांचे कारस्थान असल्याचा थेट आरोप केला होता. दरम्यान, डाव्या आणि दलित संघटनांनी आज (दि. 3) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पुरोगामी संघटनांसह मराठा संघटनांनीही प्रतिसाद दिला असून सकाळपासूनच बंदचा परिणाम दिसून येत आहे.गोंदियात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती,बहुजन समाज पक्ष,बीआरएसपी,भारत मुक्ती मोर्चा,काॅग्रेस,राष्ट्रवादी, भाकपसह सर्व पुरोगामी व ओबीसी संघटनांनी बंदला समर्थन दिले आहे.गोंदिया शहरात सकाळपासूनच बंदचा परिणाम जाणवत होता.राज्यपरिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारातून बसेस सोडतांना सुरक्षा विचारात घेऊनच सोडल्या जात होत्या.तर गोंदियातील सर्व शिक्षण संस्था,काॅलेज,महाविद्यलयांनी आधीच सुट्या देत बंदला प्रतिसाद दिला आहे.बाजार पुर्णत बंद असून राज्य परिवहन विभागासह खासगी बसेस आॅटो सर्व बंद ठेवल्याने कडकडीत बंद बघावयास मिळत आहे.बाजी केली.