नैनगुंडम जंगलात पोलिस-नक्षल चकमक : एक जवान जखमी

0
8

गडचिरोली दि.08ः – उपविभाग जिमलगट्टा हद्दितील उपपोलिस स्टेशन दामरंचा अंतर्गत येणाºया नैनगुंडम जंगल परिसरात आज सी-६० जवान नक्षविरोधी अभियान राबवित असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास पोलिस-नक्षल चकमक उडाली. यात एक पोलिस जवान जखमी झाला असून त्याला नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. सुरज गद्देवार असे जखमी पोलिस जवानाचे नाव आहे.

आज नैनगुंडम जंगल परिसरात सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगला पसार झाले. मात्र या चकमकीत सुरज गद्देवार हा पोलिस जवान जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आला आहे.