बेरार टाईम्स वर्धापन सोहळा,पालकमंत्र्याचे हस्ते आज होणार विशेषांकाचे प्रकाशन

0
17

गोंदिया,दि.14ः- गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या साप्ताहिक बेरार टाईम्स व न्युजपोर्टलच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन आज रविवार(दि.14) बेरार टाईम्स कार्यालय,शिवनगर,अंगुरबगीचा रोड येथे दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे.या कार्यक्रमात बेरार टाईम्सच्या विशेषांकाचे विमोचन  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल,जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, तिरोडा-गोरेगावचे आमदार  विजयभाऊ रहांगडाले,देवरी-आमगावचे आमदार आमदार संजयभाऊ पुराम,गोंदियाचे नगराध्यक्ष अशोकजी इंगळे,माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे,माजी खासदार शिशुपाल पटले,माजी आमदार तथा गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्रजी जैन,जिल्हाधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे, जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ .दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती पी.जी.कटरे,नगरपरिषद सभापती मैथुला बिसेन,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,दैनिक लोकजनचे संपादक प्रा.एच.एच.पारधी,शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे,मनसे जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे,दैनिक कशिशचे संपादक अॅड.विरेंद्र जायस्वाल,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,माजी.जि.प.अध्यक्ष नेतरामभाऊ कटरे,विजयभाऊ शिवणकर,नगरसेवक दिपक बोबडे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक हि.द.कटरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला वाचक,एजंट,प्रतिनिधींना उपस्थित राहणाचे आवाहन करण्यात आले आहे.