मारहाण प्रकरणी झालेल्या शिक्षेत आमदार बच्चू कडू यांना कोर्टाकडून जामीन मंजूर

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर,दि.17(विशेष प्रतिनिधी)- वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत, आमदार कडू यांना 600 रुपये दंडही भरावा लागणार आहे. अचलपूर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेत आमदार बच्चू कडू यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.गेल्या वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात आज शिक्षा सुनावण्यात आली. आमदार बच्चू कडू यांना 1 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यासोबत 600 रुपये दंडही भरावा लागणार आहे.
गेल्या वर्षी 24 मार्च रोजी आमदार बच्चू कडू हे परतवाडा एस टी डेपो चौकातून जात होते. त्यावेळी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना तिथे अनेक खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असल्याच्या दिसल्या. त्यावेळी आमदार कडू यांनी त्या परिसरातील वाहतूक पोलिस इंद्रजीत चौधरी यांना बसेसवर कारवाई का करत नाही, असा जाब विचारला. त्यावेळी आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्लिल शिवीगाळ करुन वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप होता. त्यामुळे आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.