मृत वारकèयांना विसरून मंत्र्याच्यास्तूतीच पार पडले संत समेलन

0
9

शेगाव अपघातातील वारकèयांना श्रद्धांजली वाहायला विसरले वारकरी संत समेंलन
वारकरी साहित्य परिषद मंडळाचा संतापजनक प्रकार

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.१७-अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत आयोजित वारकरी साहित्य परिषद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आज शनिवारला(दि.१७) सूप वाजले.दरम्यान समेंलनाच्या सांगता समारंभातील खुल्या अधिवेशनात ५ ठरावांना मंजुरी देण्यात आली.या तीन दिवस चाललेल्या वारकरी साहित्य परिषदेच्या समेंलनात मात्र उदघाटनापासून ते समारोपापर्यंंत कुठेही संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनासाठी शेगावला जाणाèया वारकèयांच्या गाडीला अपघात होऊन ६ वारकèयांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशीम जिल्ह्यातील पातूर बाळापूर मार्गावर ५ फेबुवारीला घडली होती.उमरा कापसे येथील १७० वारकरी श्री च्या प्रकटदिनानिमित्त शेगावला जाण्यासाठी १ फेबुवारीला निघाले होते.परंतु त्यातील काही वारकèयांवर काळाने घाला घातला व त्यांची प्राणज्योत मालवली.एकीकडे महाराष्ट्रातील वारकरी साहित्य परिषद वारकरी संप्रदायाचे विचार पोचविण्यासोबतच वारकèयांना एकत्र आणण्यासाठी संत समेंलनाचे आयोजन करते,त्याच वारकरी साहित्य परिषदेने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे ७ वे अखिल भारतीय संत साहित्य समेंलन १५,१६ व १७ फेबुवारीला आयोजित केले होते.त्या समेंलनाच्या उद्घाटनाला व सांगता समारोपातही या मृत वारकèयांना श्रद्धांजली वाहण्याचे साधे सौजन्य दाखविण्यात आले नाही.याउलट वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसह सरकारच्या स्तुती करण्यातच या कार्यक्रमात मग्न असल्याचे दिसून आले.वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनाच नव्हे तर समेंलनाध्यक्ष हभप रामकृष्ण लहवितकर यांच्यासह स्वागताध्यक्षाची धुरा साभांळणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनाही त्या वारकèयांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव समेंलनाचा खुल्या अधिवेशनात घेण्याचे सौजन्य दाखविता आले नाही,हे या समेलंनाचे अपयशच म्हणावे लागणार आहे.जेव्हा याबाबत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांना यांसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी शेगाव येथील अपघातात वारकरी ठार झाल्याची कल्पना आपणास नव्हती कुणी माहितीही दिली नाही. त्यामुळे अनवधानाने ते राहिले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत पाटील यांनी बाजू झटकत पुढच्या कार्यक्रमात त्यांना नक्कीच श्रद्धांजली वाहू असे सांगितले.

संतसमेंलनाकडे वारकरी साहित्य परिषदेच्या सचिवाने फिरवली पाठ
ज्या वारकरी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने अर्जुनी मोरगाव येथे संत समेंलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्या साहित्य वारकरी परिषदेचे सचिव व तुकाराम महारांजाचे वंशज डॉ.सदानंद मोरे यांनी पाठ फिरवली.त्यांनी पहिल्या दिवसापासून समारोपापर्यंत या संत समेंलनात येण्यास का टाळले यावर संत समेंलन परिसरातील अनेक संतामध्ये चर्चा एैकावयास मिळत होती.