राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

0
13

मुंबई ,दि.09- पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दुपारी दोन वाजता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर राज्याचा २०१७-१८चा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज, शुक्रवारी सादर होत असून, त्याआधीच्या पूर्वसंध्येला मांडण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्य विकासपथावर कायम राहील, असा आश्वासक सूर व्यक्त करण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा असताना राज्याने मात्र यंदा ७.३ टक्के विकासदर राखण्यात यश मिळवले असून, राज्याच्या दरडोई उत्पन्नातही १० टक्के वाढ झाली आहे, अशी स्वागतवार्ता या अहवालाने दिली आहे. वित्तमंत्री मुनगंटीवार यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे.

पुढील वर्षीच्या निवडणुकीमुळे सरकारला अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करावे लागेल. त्यामुळे एका अर्थाने फडणवीस सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. उद्या मांडण्यात येणाऱ्या निवडणूकपूर्व अर्थसंकल्पाविषयी सर्वांना उत्सुकता असून, वित्त मंत्र्यांकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे अनुकरण केले जाण्याची शक्‍यता आहे.