देवरी येथे स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

0
5

देवरी- देवरी येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्लूची लागण झाल्याने नागपूरच्या रुग्णालयात काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृताचे नाव हिरालाल शाहू असे आहे.
वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नूसार, हिरालाल शाहू हे १३ जानेवारी रोजी अलाहाबाद येथे गेले होते. तेथून १८ जानेवरीला परत आल्यावर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला. रुग्णाने देवरी येथील खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतला. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याने ६ फेब्रुवारीला राजनांदगाव येथील डॉ. राघवे यांचेकडे औषधोपचार केला. डॉक्टरांनी लागण असल्याचा संशय व्यक्त करीत रुग्णाला दवाखान्यात भरती होण्याचा सल्ला दिला. यामुळे रुग्णाने त्याच दिवशी सरळ नागपूर येथील सिम्स रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी एच-१ एन-१ ची तपासणी करून स्वाईन फ्लू झाल्याचे सांगितले. आज रात्री डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केले.