साकोली,अर्जुनी मोरगावली नगरपंचायतीचा दर्जा

0
18

गोंदिया-गेल्या काही महिन्यापासून नगरपंचायतीच्या मुद्याला घेऊन राजकीय वातावरण तापले असतानाच प्रशासनाने जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या आरक्षणाच्या सोडती काढल्या होत्या.त्यातच तालुकास्थळावरील ग्रामपंचायतीना नगरपंचायतींचा दर्जा देण्याचा प्रश्न विचाराधीन असताना या दोन जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकावर त्याचा परिणाम पडणार होता.हे लक्षात घेऊनच अखेर राज्यसरकारच्या नगरविकास विभागाने १२ फेबुवारी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुकास्थळ असलेल्या ग्रामपंचायतीना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आल्याची अधिसुचना काढली.यामध्ये दोन्ही ग्रामपंचायतीचे विद्यमान जे कार्यक्षेत्र आहे,त्या हद्दीचा समावेश करण्यात आल्याचे नगरविकास विभागाचे उपसचिव उ.ना.पाटील यांनी म्हटले आहे.
त्यासोबतच साकोली नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून साकोलीच्या तहसिलदार डॉ.हंसा मोहने यांची नियुक्ती करुन सर्व प्रशासकीय अधिकार त्यांना बहाल करण्यात आले आहे.