शिवरायांचा वापर केवळ निवडणुकीसाठी-पूनम महाजन

0
11

पंढरपूर,दि.12(वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हात, कमळ, घड्याळ सगळेच मते मागतात. मात्र छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची व्याख्या आपल्या विचारानुसार मांडतात नव्हे फेकतात. त्यामध्ये घड्याळ, हात आणि कमळाचाही समावेश आहे, असे  प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाच्या  राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी केले.पंढरपूर येथे पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीच्या वतीने खासदार पूनम महाजन यांना युवक क्रांतिवीर पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले, या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा साधना भोसले, लक्ष्मीकांत पारनेरकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर आदी उपस्थित होते.