28 फेब्रुवारी रोजी सादर होणार अर्थसंकल्प, सेबीचे निर्देश

0
5

नवी दिल्ली- येत्या शनिवारी, २८ फेब्रुवारी रोजी शेअर बाजार सुरू राहणार आहे. शनिवारी अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत केद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारात सकाळी नऊ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे.
बाजार नियंत्रक सेबीने मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराला या संदर्भात निर्देश दिले आहेत. इतर वेळी शनिवारी व रविवारी बाजार बंद असतात. अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरू ठेवण्याचा आग्रह बाजारांनीही सेबीकडे केला होता. राष्ट्रीय शेअर बाजारात करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि डेट सेगमेंटचे व्यवहार होणार नाही. यापूर्वी अर्थसंकल्प सायंकाळी पाच वाजता सादर व्हायचा. २००१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सर्वप्रथम सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून अर्थसंकल्पादिवशी बाजार सुरू असतात.

बजेट आणि बाजार वर्ष सेन्सेक्समधील वाढ-घट
२०१० २.६ टक्के वाढ
२०११ ०.६९ टक्के वाढ
२०१२ १.२ टक्के घसरण
२०१३ १.५२ टक्के घसरण
२०१४ ०.२८ टक्के घसरण