१० हजार कोटींचा पेट्रोलियम मंत्रालयात घोटाळा?

0
12

नवी दिल्ली : पाचही आरोपींना पेट्रोलियम मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रांच्या हेरगिरीप्रकरणात न्यायालयात हजर करण्यात आले, या आरोपींना न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून मात्र न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यातील एक आरोपी पत्रकार शांतनु सैकिया यांनी उपस्थित पत्रकारांना ओरडून सांगितले की, हा १० हजार कोटींचा घोटाळा असून मी हा प्रकार कव्हरअप करीत होतो. त्यामुळे या प्रकरणात आता गुढ निर्माण झाले आहे. या घोटाळ्यामागे आणि हेरगिरीमागे कोणत्या बड्या हस्तींचा हात आहे. हे शोधून काढण्याचे आव्हान दिल्ली पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

दस्ताऐवजींची चोरी केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पत्रकार शांतनु सैकिया यांनी दावा केला आहे की, मला या प्रकरणात गोवले जात आहे, खरे तर हा दहा हजार कोटींचा घोटाळा आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार होतो, त्यामुळेच आपल्यावर कारवाई झाली.