राज्याला स्वतंत्र ‘गृहमंत्री’ हवा-विखे-पाटील

0
9

मुंबई – महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्र गृहमंत्र्यांची नियुक्ती करण्याची मागणी विरोधक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर करत असून काँग्रेसचे विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की राज्यात कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यसरकारने स्वतंत्र गृहमंत्र्यांची नेमणूक केली पाहिजे. सध्या गृहविभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळच आहे. राज्याली जर स्वतंत्र गृहमंत्री मिळाला तर अशा प्रकरणांचा गतिने निपटारा संभव आहे.

गोविंद पानसरे यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर कोल्हापूर येथे दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरें आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते. गोविंद पानसरे यांचा शनिवारी मुंबईतील ब्रीच कैंडी रुग्णालयात मृत्यू झाला. १८ महिन्याआधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचीही हत्या अशाच प्रकारे करण्यात आली होती. दाभोलकरांचे मारेकरी अजुनही मोकाटच आहेत.