काश्मिरात भाजप-पीडीपीमध्ये सहमती

0
10

नवी दिल्ली : पीडीपी आणि भाजपमध्ये सरकार स्थापन्यावरून जम्मू -काश्मीरमध्ये सहमती झाली आहे. तसेच यासंदर्भात औपचारिक घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

सूत्रानुसार मुख्यमंत्री म्हणून पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांचे नाव निश्चित झाले आहे. औपचारिक घोषणेनंतर मुफ्ती मोहम्मद सईद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये एक आठवडाभर राहील्यानंतर शुक्रवारी जम्मूला परतलेले पीडीपी नेते मुफ्ती मोहम्मद सईदच्या निकटवर्तीय सूत्राने सांगितले की, भाजप आणि पीडीपी मधील वादाच्या मुद्दयांवर सहमती झाली आहे. संविधानाच्या कलम ३७०, सशस्त्र बदल विशेष अधिकार अधिनियम तसेच पश्चिमी पाकिस्तानी शरणार्थींची अवस्था अशा वादग्रस्त मुद्दयांवर किमान कार्यक्रमांतर्गत सहमती बनली आहे.