भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक मतमोजणीला प्रारंभ

0
19

गोंदिया/भंडारा,दि.31ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरीता झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला भंडारा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात कडेकोट बंदोबस्तात सुरु झाली आहे.सकाळी 8.30 वाजता प्रथम बॅलेटपेपरच्या मतमोजणीला सुरवात झाली.त्यानंतर ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरवात झाली असून दुसर्या राऊंडमध्ये राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे 1082 मतानी समोर आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक मतमोजणीला सुरवात झाली असून तुमसर विधानसभा मतदारसंघापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे समोर असल्याचे वृत्त आहे.तर बॅलेटमतमोजणीमध्ये भाजपचे हेमंत पटले आघाडीवर असल्याची वृत्त आहे.