24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ मुंडीकोटाजवळ खासगी बसला अपघात

मुंडीकोटाजवळ खासगी बसला अपघात

0
25

तिरोडा,दि.31ःःतुमसर-गोंदिया राज्यमार्गावरील मुंडीकोटा ते जमनानगर दरम्यान असलेल्या बळीराम ठवकर यांच्या कुक्कुटपालन केंद्राजवळ बुधवारच्या रात्रीला 10 वाजेच्या सुमारास खासगी बसच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने मुंडिकोटावरुन तिरोडाला परत येत असताना अपघात घडला.यात खासगी बस रस्त्याच्याकडेला पलटल्याने वाहनचालक किशोर अटराहे व राजेश बनसोड हे जखमी झाले आहेत.त्यांना गोंदियाचा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.बसमध्ये प्रवासी नसल्याने जिवितहानी झाली नाही.