पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित आघाडीवर, शिवसेना तिस-या स्थानावर

0
9

मुंबई,दि.31- पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी नुकतीच सुरू झाली आहे. सध्या पोस्टल मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतमोजणीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या राऊंडमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी 11236 मतांसह सर्वात पुढे आहेत.पालघरमध्ये 7 उमेदवार रिंगणात आहेत. 28 मे रोजी याठिकाणी मतदान झाले. मतदानाचा टक्का घसरल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढलीय. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेनं दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना रिंगणात उतरवले होते. तर भाजपानं काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. याशिवाय काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव रिंगणात आहेत.

9.33 AM- तिस-या राऊंडमध्ये अशी आहे स्थिती

राजेंद्र गावित (भाजप)- 35 हजार मते

बळीराम जाधव (बविआ)- 30 हजार मते

श्रीनिवास वनगा (शिवसेना)- 26 हजार मते

दामोदर शिंगडा (काँग्रेस) – 9 हजार मते

इतर- 12 हजार 131

9.23 AM- दुसरा राऊंडमध्ये अशी आहे स्थिती

राजेंद्र गावित (भाजप)- 23 हजार 271 मते

बळीराम जाधव (बविआ)- 18 हजार 923 मते

श्रीनिवास वनगा (शिवसेना)- 18 हजार 505

दामोदर शिंगडा (काँग्रेस) – 3422

इतर- 12 हजार 131

9.10 AM- पहिल्या राऊंडमध्ये अशी होती स्थिती-

राजेंद्र गावित (भाजप)- 11 236 मते

बळीराम जाधव (बविआ)- 11090

श्रीनिवास वनगा (शिवसेना)- 8190

दामोदर शिंगडा (काँग्रेस) – 1757

इतर- 6658.

9.04 AM: पहिला राऊंड झाला तरी अधिकारी मतांची आकडेवारी देत नसल्याने वाद कायम.

9.00 AM- पालघरमध्ये निवडणूक अधिकारी व पत्रकारांमध्ये वादावादी, निवडणूक अधिकारी निकालाची आकडेवारी व माहिती देत नसल्याने सुरू झाला वाद