सातव्या फेरीत 18 हजाराने कुकडे आघाडीवर!

0
10

गोंदिया/भंडारा,दि.31ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरीता झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या फेर्यांना सुरवात झाली आहे.तिरोडा विधानसभा मतदारसंघ वगळता भाजप आमदाराला कुठेच आघाडी मिळताना दिसून येत नाही.तर सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे 18 हजाराने आघाडी घेतल्याची माहिती येत आहे.विशेष म्हणजे गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातही भाजपला आघाडी मिळू शकलेली नाही.पालकमंत्र्यांनी अहोरात्र मेहनत घेऊनही याठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने घेतलेली आघाडी ही माजी खासदार नाना पटोले यांचे आजही त्या मतदारसंघावर पकड असल्याचे दाखवत आहे.तिरोडा विधानसभा मतदारसंघानेच सद्या भाजप उमेदवार हेमंत पटले यांना तारुण ठेवले आहे. पहिल्या फेरीत मधुकर कुकडे यांना 18028 (राष्ट्रवादी काँग्रेस) तर हेमंत पटले यांना 17246(भाजप) मते मिळाली.दुसर्या फेरीमध्ये कुकडे यांना 35512 व पटले यांना 33306 मते तिसरी फेरीत राष्ट्रवादीचे कुकडे यांना 51219,भाजपचे हेमंत पटेल यांना 48382 मते मिळाल्याची अधिकृत माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.