रेल्वे अर्थसंकल्पात ‘सुसाट’ घोषणा; भाडेवाढ नाही

0
5

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने प्रथमच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एकही नव्या गाडीची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच मुंबईत एसी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. प्रवाशांना सोईसुविधा पुरविण्यावर या रेल्वे अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये –
– रेल्वेच्या तिकीटदरात वाढ होणार नाही
– ट्रॅक वाढवण्याला पुढील काळात प्राधान्य देण्यात येणार
– रेल्वेचा पुनर्जन्म होणार आहे, रेल्वेत खासगी कंपन्यांकडून गुंतवणूक होणार
– पाच मिनिटांत विनाआरक्षण तिकीट मिळणे शक्य होणार आहे
– हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये तिकीट मिळणार
– रेल्वेचे जाळे देशभर वाढविणे हे रेल्वेचे लक्ष्य आहे
– रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे
– आयआरटीसीची वेबसाईट इतर भाषांमध्येही सुरू होणार
– रेल्वे ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे
– रेल्वे स्थानकांवर 17000 बायोटॉयलेट उभारण्यात येणार
– 108 रेल्वेगाड्यांमध्ये ई केटरिंगची सुविधा सुरू करणार
– महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
– अनेक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करणार
– तक्रारीसाठी रेल्वेची हेल्पलाईन 24 तास सुरु ठेवणार
– मोबाईल चार्जिंगची सुविधा जनरल डब्यातही, ए आणि बी कॅटेगरी स्टेशनवर फ्री वायफाय
– गाड्यांची माहिती देण्यासाठी ‘एसएमएस अलर्ट‘ सुविधा
– पुढील पाच वर्षात रेल्वेचा वेग आणि क्षमता वाढवणार
– महिला यात्रेकरूंसाठी निर्भया फंडातून निधी देण्यात येणार
– रेल्वेमध्ये टॉयलेट्सची स्थिती सुधारण्यावर भर
– एकाच ट्रॅकवरुन अनेक गाड्या धावतात, त्यामुळे ट्रॅक वाढवण्यात येणार
– रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडणार,विमानाप्रमाणे रेल्वेतही व्हॅक्युम टॉयलेटची सुविधा
– मुंबईमध्ये वातानुकुलित रेल्वे चालविणार
– स्टेशन आणि रेल्वे स्वच्छतेसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणार
– रेल्वेत वरच्या बर्थमध्ये जाण्यास नवी सुविधा सुरू करणार
– रेल्वेचे तिकीट चार महिने आगोदर उपलब्ध होणार
– मोठ्या स्थानकांवर लिफ्ट, एक्सलेटरची सुविधा सुरू करणार
– ज्येष्ठ नागरिकांना खालचे बर्थ मिळण्यासाठी प्रयत्न करणार
– ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत‘ मोहीम राबविणार
– ट्रॅक दुहेरी करण्यावर भर द्यावा लागेल
– जास्त मागणी असणा-या गाड्यांना अधिक डबे जोडण्यात येणार
– पुढच्या पाचवर्षात रेल्वेमध्ये ८.५ लाख कोटींच्या गुंतवणूकीचे लक्ष्य
– रेल्वे बजेट तयार करताना २० हजार सूचनांचा विचार करण्यात आला
– गाड्यांमध्ये नवीन पद्धतीच्या सीट्स डिझाइन करणार
– शेतकऱ्यांसाठी रेल्वे कार्गो विभाग सुरू करणार
– रेल्वेच्या सुधारणांची गती कमी आहे
– नऊ मार्गांवर ताशी 200 किमी गती वाढविण्यात आली आहे
– ईशान्य भारतात रेल्वेचं जाणं वाढवण्यावर भर
– 66000 किलोमीटर ट्रॅकचं तातडीनं विद्युतीकरण
– अपंगांसाठी व्हिलचेअरचं बुकिंग ऑनलाईन करता येणार
– रेल्वेचं जाळे देशभर पसरवण्यावर भर
– बुलेट ट्रेनचे काम यावर्षी सुरू होणार
– दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकता ट्रॅकचे वेग वाढविणार
– मानवरहित क्रॉसिंगवर अलार्म बसविण्यात येणार
– तीन हजार मानवरहित क्रॉसिंग लवकरच बंद करण्यात येणार
– रेल्वेचा अपघात टाळण्यासाठी अलार्म सिस्टीम सुरू करणार
– रेल्वेचे अपघाट टाळण्यासाठी जूनपर्यंत ऍक्शन प्लॅन तयार करणार
– मुंबई-दिल्लीसह नऊ मार्गांवर हायस्पीड गाड्या सुरू करणार
– निवडक स्टेशनवर पिकअप आणि ड्रॉपची सुविधा सुरू करणार
– वाराणसी येथे मदनमोहन मालवीय यांच्या नावाने रेल्वेचे अध्यासन केंद्र सुरु होणार
– प्रवासी सुविधेसाठी 138 हा क्रमांक सुरू राहणार
– वेग, सुरक्षा, रुंदीकरण आणि आधुनिकीकरण याला रेल्वेचे प्राधान्य असणार आहे
– मालगाड्यांमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी बसविण्यात येणार
– रेल्वेमध्ये विकासासाठी पीपीपी मॉडेलचं सहकार्य घेणार
– किनाऱ्यांवरील शहरांना रेल्वेने जोडणार
– मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम याचवर्षी सुरू करण्यात येणार
– आरपीएफसाठी नवं विद्यापीठ स्थापन करणार
– रेल्वेचा योजना खर्च ५२ हजार कोटींवरून दुप्पट करण्यात येणार
– स्टेशन, रेल्वे गाड्यांना कंपन्यांची नावे देऊन पैसा उभारणार
– रेल्वेचा खर्च दुपटीने वाढला
– रेल्वेमध्ये सौर उर्जेचा वापर अधिक करण्यावर भर देणार
– रेल्वेच्या जमिनींवर 1 हजार कोटींची गुंतवणूक करून सौरउर्जा प्रकल्प उभारणार
– कामगिरीवर आधारित बोनस देण्याची परंपरा सुरू करणार
– रेल्वेमध्ये नोकरीसाठी आता ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देणार
– यावर्षी रेल्वे विश्वविद्यालय सुरू करण्यात येणार, रेल्वेशी संबंधित विषय शिकविण्यात येणार
– कोकण रेल्वेवर तीन वर्षांत 50 हजार जणांना नोकऱ्या देणार
– स्किल डेव्हलपमेंधसाठी रेल्वेही योगदार देणार
– अतुल्य भारतासाठी अतुल्य रेल्वे सुरू करणार
– एक भारत श्रेष्ठ भारतासाठी सर्वांच्या सहयोगाची गरज आहे
– एकही नवी गाडी सुरू होणार नाही
– सर्वे करून नव्या गाड्यांची घोषणा करण्यात येणार