सातवीची विद्यार्थीनी झाली आई

0
11

इंदूर (मध्य प्रदेश)- खंडवा जिल्हा रुग्णालयात सातवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही विद्यार्थीनी केवळ 13 वर्षांची आहे. मुलाला जन्म दिल्यावर विद्यार्थीनी म्हणाली, की मला या मुलाच्या वडिलांचे नाव माहित नाही. विद्यार्थीनीची आई म्हणाली, की मुलगी गर्भवती असल्याचे आम्हाला समजलेच नाही. आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
खेडी या गावातील शाळेत ही विद्यार्थीनी सातव्या वर्गात शिकते. तिच्या पोटात दुखत होते. त्यानंतर तिची आई तिला घेऊन खंडवा जिल्हा रुग्णालयात आली. येथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यानंतर तिला दाखल करुन घेतले. या दरम्यान विद्यार्थीनीने रुग्णालयातच मुलाला जन्म दिला. तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. दोघांचीही प्रकृती ठिक असून त्यांना दोन-चार दिवसात डिस्चार्ड दिला जाणार आहे
तिच्या आईने सांगितले, की मुलीला धरुन मला सहा मुले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तिला ताप होता. तिचे पोट दुखत होते. तिची शरीरयष्टीही सामन्य मुलीसारखी दिसत होती. तिला बघितल्यावर ती गर्भवती असेल असे चुकूनही वाटत नव्हते. माझ्या मुलीचे आयुष्य बर्बाद करणारा कोण आहे हे माहित नाही. पण आता समाजात तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही. गेल्या एका महिन्यापासून ती शाळेत गेली नव्हती. तिचे पोट दुखत होते. गेल्या काही दिवसांमध्ये पोटदुखी वाढली होती.
विद्यार्थीनी म्हणते, काही माहित नाही, काही महिन्यांपूर्वी झाली होती बेपत्ता
मुलाच्या वडिलांबद्दल काहीही माहिती नसल्याचे या विद्यार्थीनीने सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी ही विद्यार्थीनी बेपत्ता झाली होती. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी ती घरी परत आली. बाल कल्याण समिती या विद्यार्थीनीला विश्वासात घेऊन माहिती मिळवणार असल्याचे समजते.
पालन-पोषण करणार
विद्यार्थीनीची आई आधी म्हणत होती, की कुणाला हा मुलगा हवा असेल तर घेऊन जा. त्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. मुलाला घेण्यासाठी सगळे तिच्या आईकडे येऊ लागले. आता तिची आई म्हणते, की आम्हीच त्याचे पालन-पोषण करु.