छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 7 नक्षलींचा खात्मा

0
13
file photo

रायपूर(वृत्तसंस्था)दि.19- छत्तीसगडमध्ये सुरक्षा आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये 7 नक्षलवाद्याच्या खात्मा करण्यात जवानांना यश आले. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. गुरुवारी (19 जुलै) सकाळी दंतेवाडा-बिजापूर सीमा परिसरात तिमेनर जंगलात या सात नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.  शिवाय, घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सध्याही परिसरात चमकम सुरू आहे.

परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाली मिळाली. यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहीमेदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.दरम्यान, बुधवारीदेखील (18 जुलै) राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जरिना नावाची महिला नक्षलवादी ठार झाली. कोंडल हिल्सनजीकच्या जंगलात ही चकमक सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास झाली. ती 2005 पासून नक्षलवादी चळवळीत सक्रीय होती. तिच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते.