पेट्रोलपंप वितरकांचा 21 मार्च रोजी ‘ब्लॅकआऊट’

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – अखिल भारतीय पेट्रोलियम वितरक संघटनेने 21 मार्चला 15 मिनिटांचा ‘ब्लॅकआऊट‘ घोषित केला आहे. यादरम्यान पेट्रोल पंपावरील सर्व दिवे बंद करण्यात येतील तसेच त्यादरम्यान पेट्रोलची विक्री बंद राहणार आहे.

पेट्रोलियम वितरकांना वेळोवेळी तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा ‘ब्लॅकआऊट‘ घोषित करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या सतत बदलणाऱ्या किंमतींविषयी संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. विविध विषयांत निश्चित 5 टक्के कमिशन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वितरकांकडून पुन्हा पुन्हा मांडण्यात येणाऱ्या समस्या प्रकाशात आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे असोसिएशनने सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. तसेच 31 मार्च रोजी ‘नो परचेस डे‘ पुकारण्याचा विचार सुरू आहे. जर गरज पडली तर हा संप पुकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘नो परचेस, नो सेल डे‘ देखील भविष्यात पुकारला जाण्याची शक्यता आहे.