होळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि सिकंदराबाद-पाटणा दरम्यान विशेष गाडी

0
11

नागपूर, २८ फेब्रुवारी
होळीनिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर-एलटीटी मुंबई-नागपूर आणि सिकंदराबाद-पाटणा-सिकंदराबाद दरम्यान विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
०१०१७ एलटीटी मुंबई-नागपूर ही गाडी एलटीटी येथून ५ मार्च रोजी रात्री ००.४५ वाजता सुटेल आणि त्याचदिवशी दुपारी १५ वाजता ही गाडी नागपूरला येईल. ही गाडी बडनेरा येथे सकाळी ११.२०, धामणगाव दुपारी १२, पुलगाव १२.१८, वर्धा १२.४५ वाजता येईल.
त्याचप्रमाणे ०१०१८ नागपूर-एलटीटी मुंबई ही गाडी नागपूर येथून ५ मार्च रोजी रात्री २१.१५ ला सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी १३.१० वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी वर्धा येथे रात्री २२.५०, पुलगाव २३.२०, धामणगाव २३.४० आणि बडनेरा ००.३५ ला येईल.
या दोन्ही गाड्या ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, पुलगाव आणि वर्धा स्थानकावर थांबेल. १८ डब्यांच्या या गाडीला १ द्वितीय एसी, २ तृतीय एसी, ७ शयनयान, ६ साधारण द्वितीय आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश आहे.
सिकंदराबाद-पाटणा
०२७९१ सिकंदराबाद-पाटणा ही सुपरफास्ट गाडी सिकंदराबाद येथून १ मार्च रोजी सकाळी ६.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी १३.४५ वाजता ही गाडी पाटण्याला पोहोचेल. ही गाडी १ मार्च रोजी सकाळी ११.५० वाजता बल्लारशा आणि दुपारी १५ वाजता नागपूरला येईल.
०२७९२ पाटणा-सिकंदराबाद ही गाडी पाटणा येथून ३ मार्च रोजी रात्री २३.३० वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी ५ वाजता सिकंदराबादला पोहचेल. ही गाडी ४ मार्च रोजी सायंकाळी १९.५० वाजता नागपूर आणि रात्री २३.१५ वाजता बल्लारशाला येईल.
ही गाडी काजीपेठ, रामागुंडम, बल्लारशा, नागपूर, इटारसी, जबलपूर, सतना, चेवकी आणि मुगलसराय या स्थानकांवर थांबेल. १७ डब्यांच्या या गाडीला १ द्वितीय एसी, २ तृतीय एसी, ८ शयनयान, ४ साधारण द्वितीय आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश आहे.