31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Top News खड्ड्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

खड्ड्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
22

यवतमाळ,दि.09 : शहरात समाज कल्याण वसतिगृहाचे बांधकामासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाणी मिळावे म्हणून खड्डा तयार करण्यात आला. दुर्दैवाने त्यात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलाचा मृत्यू झालाही घटना आज सकाळी ८.३० दरम्यान घडली. यामध्ये दोन मुले असल्याची शक्यता वर्तवली जात असून दोघांचा मृतदेह हाती लागला आहे. दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात आला अजून विद्यार्थ्यांचा शोध घेणे सुरू आहे. दोन्ही मुलांच्या सायकली खड्ड्याच्या शेजारी असून, आणखी दोन-तीन मुले गायब असल्याचे पालक सांगत आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावर पोलिस पोहोचले असून मुलांचा शोध घेणे सुरू आहे. पालक व गावकरी मोठ्या संख्येत जमले आहे.