26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News गोन्साल्विस, फरेरा यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

गोन्साल्विस, फरेरा यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

0
32

पुणे,दि.23ः- माओवाद्यांशी संबंधांचा आरोप असलेल्या व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना पुणे सत्र न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयावे या दोघांसह सुधा भारद्वाज अशा तिघांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गोन्साल्विस आणि फरेरा यांना अटक झाली. तर सुधा भारद्वाज यांना फरिदाबादमधून अटक करण्यात आली.गोन्साल्विस व फरेरा यांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील अन्य दोन संशयित डॉ. सुरेंद्र गडलिंग आणि शाेमा सेन यांच्या जामीन अर्जावर १ नोव्हेंबर राेजी सुनावणी होणार असून दाेघांच्या अर्जास एक अाठवड्याची स्थगिती न्यायालयाने दिलेली आहे.