वासनी ते पिपरखारीच्या जंगलात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटके लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळताच चिचगड पोलीस तसेच सी-६० कमांडो तसेच बी. डी. डी. एस. यांच्या पथकाने संयुक्तरित्या शोध मोहीम हाती घेतली होती.दरम्यान डांबरीकरण रस्त्याच्याखाली २ मोठ्या जर्मनच्या डब्यात स्फोटकाचे साहित्य नक्षलवाद्यांनी लपवून ठेवले होते. या स्फोटकांमध्ये २ जर्मन डबे (अंदाजे प्रत्येकी ७ किलो ), काचेचे लहान-मोठे तुकडे (अंदाजे ५ किलो ), गंजलेले लोखंडी खिळे (अंदाजे २ किलो ), सिमेंट रंगाचे ओलसर स्फोटक पदार्थ (अंदाजे ६ किलो ) २ डेटोनेटर पांढऱ्या रंगाची वायर (अंदाजे १० फूट लांब ), काळसर रंगाची वाहनांची रबरी ट्यूबचा तुकडा, काळ्या रंगाची सेलोटेप (अंदाजे २ फूट ), थर्माकोलचे तुकडे इत्यादी साहित्य स्फोटकातून मिळालेले आहे.या संदर्भात चिचगड पोलीस ठाण्यात कलम 307,120(ब),सहकलम 16,20,23 तसेच भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या माओवादी संघटनेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.





