हिंगोली गेट परिसरात तांडाबारचे मालक सुरेश राठोड यांच्यावर गोळीबार

0
15

नांदेड(नरेश तुप्टेवार),दि.02 – शहरात बार चालवणाऱ्या सुरेश टिकाराम राठोड (उमरी)सध्या नांदेड येथील हनुमान गड परिसरात रहिवासी यांच्यावर हिंगोली गेट परिसरात अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे12.3 ते 1 च्या सुमारास घडली.घटनेनंतर रुग्णालयात पोलीस अधीक्षक संजय जाधव अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी धाव घेतली. सध्या राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले उमरी येथील दिवंगत प्रसिध्दसमाजसेवकव डॉक्टर डॉ टिकाराम डी राठोड यांचे सुरेश राठोड हे कनिष्ठे सुपुत्र आहेत तर

नांदेड – शहरात बार चालवणाऱ्या सुरेश शेट राठोड यांच्यावर हिंगोली गेट परिसरात अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 1 च्या सुमारास घडली.घटनेनंतर रुग्णालयात पोलीस अधीक्षक संजय जाधव अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी धाव घेतली. सध्या राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

सुरेश राठोड हे रात्री हनुमांगड परिसरात असलेल्या आपल्या निवासस्थानाहून हॉटेलकडे हिंगोली गेट मार्गे दुचाकीवरून जात होते. वसंतराव नाईक चौक येथून एका दुचाकीवरून दोन युवकांनी त्यांचा पाठलाग केला. उड्डाणपुलाखाली येतात त्यांच्यावर फायरिंग केली यात त्यांच्या मांडीला जबर दुखापत झाली.याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस अधीक्षक संजय जाधव शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन मारेकरी दिसत असून त्यांची ओळख पटत नसल्याचे फौजदार गोपीनाथ वाघमारे यांनी सांगितले.सध्या नांदेड जिल्ह्यसह शहरात अवैध धंदे व लूटमार व हल्ले करणाऱ्याचे प्रमाण वाढले असून जिल्ह्याचे पुलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जातीने लक्ष घालून बंदोबस्त करावा असे जनतेतून मागणी होत आहे