26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home Top News सेजगाव येथे विद्युत शार्टसर्कीटने आग,तिरोड्यात सिलेंडरचा स्फोट

सेजगाव येथे विद्युत शार्टसर्कीटने आग,तिरोड्यात सिलेंडरचा स्फोट

0
17

गोंदिया,दि.29ः- गंगाझरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या ग्राम सेजगाव येथील रुपशंकर पारधी , डाॅ रविंद्र पारधी यांच्या घरासमोरील गोठ्याला विद्युत शाॅर्टसर्कीटमुळे आग लागुन भीषण हानी झाल्याची घटना आज घडली.सुदैवाने जिवित हानी टळली.आग आटोक्यात आणण्यासाठी गावकरी प्रयत्न करीत असून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.येथील नागरिकांनी वारंवार विद्युत विभागाला लोबंकळणारे तार दुरुस्त करण्याची मागणी केली होती.परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे.यापुर्वी याच गावात विद्युत तार पडल्याने एका महिलेचा मृत्यू झालेला होता.गावामध्ये विद्युत विभागाबद्दल असंतोष उफाळून आलेला आहे.

तिरोडा शहरातील गजानन मंदिराच्या शेजारच्या घरात गॅस सिलेंडर विस्फोट झाल्यामुळे आग लागली आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून घटनास्थळावर तहसीलदार संजय रामटेके व पोलीस विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.आग आटोक्यात आणण्यासाठी अदानी पॉवर येथून 1 अग्निशन गाडी मागविण्यात आले आहे. परंतु सध्या आगीवर नियंत्रण करता आले नाही.