सावित्रीबाई फुलेंच्यामुळेच महिला रणरागिणी-किशोर तरोणे

0
12

अर्जुनी मोरगाव,दि.29 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिक्षित झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रीला तिचे हक्क व अधिकार प्रदान करून ्त्रिरयांना समानतेचा अधिकार दिला. यामुळेच महिला आता अबला नसून सबला झाल्या आहेत. स्त्री ही सर्व शोधांची जननी असतानासुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीमुळे ती गुलामगिरीत जीवन जगत होती. मात्र, महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीमुळे गुलामगिरीच्या बेड्या तोडून महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वकष्टाने आपल्या कर्तृत्वावर खरे उतरून स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला आता रणरागिणी झाल्या असल्याचे विचार युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी व्यक्त केले आहे.

तालुक्यातील सावरटोला येथे एकात्मिक बालकल्याण विभाग अर्जुनी मोरगावच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सावरटोलाच्या सरपंच वैशाली राखडे होत्या. उद्घाटन जि.प. सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका वीणा वैद्ये, संगीता ठाकरे, उपसरपंच भागवत मुंगमोडे, सुनील लांजुळकर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष केशव बांबोळे, राधेश्याम तरोणे, सर्व ग्रा.पं. सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.पर्यवेक्षिका वीणा वैद्य यांनी महिला व बालकल्याण विभाग अर्जुनी मोरगावच्या वतीने आयोजित महिला बालक व पालक मेळावा घेण्यामागील भूमिका प्रास्ताविकातून विशद केली. महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांना सदर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन किशोर तरोणे यांनी केले. संचालन पर्यवेक्षिका सुनीता दमाहे यांनी केले. आभार पंचफुला बांबोळे यांनी मानले.