गोंदियालाच मध्यप्रदेशात जोडून घ्या सर्वच प्रश्न निकाली निघतील -मुख्यमंत्री कमलनाथ

0
10
मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेलांना बसण्यासाठी खुर्ची नसल्याने मुलगा प्रज्वलनेच खुर्ची आईसाठी पहिल्या रांगेत आणली.त्यानंतर त्या बसल्या जेव्हा की संस्थेचे कर्मचारी बघतच राहिले.
नाना पटोले पहिल्यांदाच कार्यक्रमाला हजर
मनोहरभाई जंयती निमित्त मध्यप्रदेशातील नेत्यांचीही पहिल्यांदाच हजेरी
गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.०९ः-शिक्षणाच्या क्षेत्रात आज महत्वपुर्ण परिवर्तन झाले असून आधी आपण शिक्षण घेण्यासाठी शाळेत जायचो आज मात्र ज्ञान घेण्यासाठी शाळेत जातो.ती बाब आजपासून ५०-६० वर्षापुर्वी मनोहरभाई पटेलांनी कळली आणि त्यांनी एकाच दिवसात तत्कालीन भंडारा जिल्ह्यात गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करुन २२ शाळा महाविद्यालये उघडून शिक्षणाची दारे उघडली.फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मनोहर पटेलांनी समाजसेवेसाठी राजकारण स्विकारुन राजकारणलाच समाजसेवा ठरवित कार्य केले.सध्याची पिढी ही पुस्तकी ज्ञानाची पिढी राहीली नसून ती संगणकासोबत चालणारी पिढी आहे.त्यामुळे शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षणात परिवर्तनही करणे तेवढेच महत्वाचे आहे.आपला देश हा शिक्षण,संस्कृती व मुल्यावर अवलबूंन असून देशात कितीही विभीन्नता असली तरी ती संस्कृती व मुल्याच्या आधारे टिकून आहे.देशात विविध धर्म,पंथ,अनेक भाषा असतांनाही आज एकता आहे ही एकता टिकविण्यासाठी या पिढीने संगणकीय ज्ञानासोबतच संस्कृती मुल्य जोपासले पाहिजे.गोंदिया माझ्याकरीता नवीन नसून माझे जुने संबध या शहराशी आहे.त्यामुळे गोंदिया-बालाघाट या जिल्हयातील कुणीही शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही देत रखडलेल्या qसचन योजनावंर सकारात्मक पुढाकार घेतले जाईल असे आश्वासन देत हे सर्व प्रश्नच सोडवायचे असतील तर गोंदिया जिल्ह्याल्याच मध्यप्रदेशात समाविष्ठ करुन टाका असे विचार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले.
ते येथील डी.बी.सायंस महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती समारोह व सुवर्ण पदक वितरण कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संजय दत, उद्योगपती अनिल अग्रवाल,किरण अग्रवाल,मध्यप्रदेशचे मंत्री प्रदीप जायस्वाल, म.प्र. विधानसभेचे उपाध्यक्ष हिना कावरे, खासदार मधुकर कुकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नाना पटोले, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार गोपालदास अग्रवाल,प्रकाश गजभिये,नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, रमेश डोंगरे, विलासराव श्रृंगारपवार,माजी खा.विश्वेश्वर भगत, माजी मंत्री नाना पंचबुद्धे,आ. संजय उईके, माजी आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, सेवक वाघाये, माजी आ. दिलीप बन्सोड, अकादमीच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल,हरिहरभाई पटेल,पुष्पा कावरे उपस्थित होते.
सुरवातीला मनोहरभाई पटेलांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व पाहुण्यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार सुवर्णपदकाने करण्यात आला.
प्रास्तविकपर अध्यक्षीय भाषणात प्रफुल पटेल यांनी गोंदिया शहराच्या विकासात कमलनाथ यांचे राहिलेले मोलाचे योगदान शहरवासी कधीच विसरणार नसल्याचे सागंत तालुक्यातील डांगुर्ली सिंचन योजनेकरीता मध्यप्रदेश सरकारने तत्काळ मंजुरी दिल्यास गोंदिया व वारासिवनी तालुक्यात सिंचन क्रांती होणार असे म्हणाले.मनोहरभार्इंनी त्याकाळी सुरु केलेल्या शिक्षण संस्थेत ६० हजारावर कर्मचारी नोकरी करीत असून दीड लाखावर विद्यार्थी विदर्भातील महाविद्यालय,शाळामध्ये शिक्षण घेत असल्याचे म्हणाले.त्याचप्रमाणे उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी आमच्या जिल्हयातील गौणखनिज संशाधनाचा वापर करुन याठिकाणी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन केले.मुख्यमंत्री कमलनाथ आमचे मार्गदर्शक असून त्यांनी मागास भागाच्या विकासात हातभार लावावे असे सांगत संजय दत्त यांच्यापासून नव्या पिढीला ऊर्जा मिळेल अशी आशा व्यक्त केली.
राजकारणात आपले गॉडफादर मुख्यमंत्री कमलनाथ-आ.गोपालदास अग्रवाल
यावेळी बोलतांना आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की राजकारणात गॉडफादर का असावे लागते याचा प्रत्यय मला २००४ च्या निवडणुकीत बघावयास मिळाले.जेव्हा माझी उमेदवारीच काँग्रेसने कापली तेव्हा मी विदेशात असलेले कमलनाथ यांना संदेश दिला की माझी उमेदवारी कापली गेली असून मी परत जात आहे.तेव्हा कमलनाथ यांनी रात्रीपर्यंत देशात परत येतो तुम्ही qचता करु नका असा धिर दिला आणि रात्रीला परतल्यानंतर त्यानी लगेच दुसèयादिवशी सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपली उमेदवारी कायम करुन दिली.तेव्हा राजकारणात कुणीतरी आपल्या पाठीशी असायला हवे असे वाटले तेव्हापासून आपण कमलनाथ यांचे सख्खे मित्र आहोत परंतु आपल्याच जवळच्यांनी आपल्याला त्यावेळी दगा दिला याचेही दुःख असल्याचे विचार मांडत गोंदिया विधानसभा मतदारसंघ माझा नसून मनोहरभार्इंचा हा मतदारसंघ असल्याने त्या मतदारसंघातील qसचन विकासासाठी सहकार्य करावे अशी विनंती करित गेल्या १८ वर्षापासून मध्यप्रदेश सरकारच्या सिंचन मंडळाने बैठक न घेतल्याने डांगोर्लि सिंचन प्रकल्प रखडल्याची आठवण करुन दिली.हा प्रकल्प पुर्ण झाला तर गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात सिंचन क्रांती होऊन कॅलिफोर्निया होण्यापासून या दोन्ही जिल्ह्यांना कुणी रोखू शकणार नसल्याचे सांगितले.
यावेळी खासदार मधुकर कुकडे यांनीही मध्यप्रदेश सरकारने तेलंगाना सरकारसारखे शेतकèयांना सोयी सुविधा द्यावेत सोबतच महाराष्ट्रातही त्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त करीत सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली.
गुणवत्तापुर्ण शिक्षणाची गरज,पण सरकार सावत्र व्यवहार करते-माजी खासदार नाना पटोले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर qचता व्यक्त करीत येथील राज्यसरकार सुडभावनेतून काम करीत शिक्षणाला सावत्रपणाची वागणूक देत असल्याची टिका केली.भाजपचे सरकार हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शाळा महाविद्यालये असल्याचे कारणे दाखवत शिक्षण विभाग त्रासदायक धोरण राबवित असल्याचि टिका करीत चांगल्या व उत्तम शिक्षणाची व गुणवत्तापुर्ण शिक्षणाची गरज असल्याचे विचार मांडले.सोबतच राज्यात १५३ तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊन टँकर सुरु झाल्याने नदीचे पाणी अडवून त्याचावापर सिंचन व पिण्यासाठी आपल्या भागात करणे गरजेचे आह अन्यथा आपल्याभागातही अशी परिस्थिती या सरकारच्या काळात येण्याची नामुष्की ओढवण्याची भिती व्यक्त केली.
वर्षा पटेलांनी लोकसभेची निवडणुक लढवावी आम्ही पुर्ण सहकार्य करु -वेदांता गृपचे उद्योगपती अनिल अग्रवाल
वेदांता गृपचे अनिल अग्रवाल यांनी आपण पहिल्यांदाच गोंदियात आलो असून याठिकाणी अनेक सोयीसुविधा व चांगल्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.आपल्या उद्योगात लागणाèया अभियांत्रिकी व इतर विषयातील विद्याथ्र्यासांठी पुढच्यावर्षापासून भरतीच्यावेळी याठिकाणी येऊन येथील युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.सोबतच छत्तीसगडमध्ये असलेल्या बाल्को कंपनीच्या माध्यमातून गोंदियात काही होऊ शकते का याचा विचार करण्याचे आश्वासन दिले.
गोंदियातील स्ट्राबेरी खाऊन मला खुप आनंद
यावेळी बोलतांना सिनेअभिनेता संजय दत्त यांनी आपल्या खास शैलीत गोंदियातील स्ट्राबेरी खाऊन मला खुप आनंद आला.वर्षा पटेलजी स्ट्राबेरी,पपईसोबत भाताची शेती करुन उत्पादन करतात हे बघून आश्चर्य वाटले असे म्हणताच उपस्थितामध्ये चांगलाच हशा पिकला.सोबतच गोंदियातील नैसर्गिक स्थिती शाळा महाविद्यालयाच्या ईमारती बघून लोणावळा-खंडाळ्यापेक्षा गोंदियातच चांगली फिल्मसिटी निर्माण होऊ शकते याकेडही प्रफुलभाईनी आता लक्ष द्यायला हवे असे म्हणत आपल्या वाईट दिवसाच्या काळात मला नेहमी भेटायला येऊन प्रफुलभाई विचारपुस करीत राहायचे.तेव्हा मला फक्त आपले पारिवारीक संबध आहेत एवढेच माहित होते परंतु आज येथे येऊन प्रफुलभाई राजकारणही करतात असे सांगत त्यांनी विमानमंत्री असताना केलेले काम उल्लेखनिय असून कमलनाथजी जसे परत आले तसेच तुम्हीही परत सत्तेवर येऊन नवीन काम करा असे म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन,नरेश माहेश्वरी यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.