29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Top News एटापल्ली तालुक्यात 4 वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ

एटापल्ली तालुक्यात 4 वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ

0
41

गडचिरोली,दि.13 – जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यापासुन २५ किमी अंतरावरील पुस्के येथे १२ मार्चच्या मध्यरात्री नक्षल्यांनी रस्ता कामावरील चार वाहने जाळल्याची घटना आज(दि.13) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर गावात मागील काही दिवसापासुन रस्त्याचे बांधकाम सुरु होते. तसेच दोन दिवसापूर्वी याच गावात एका रोडरोलरला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न केला गेला. माहितीनुसार काल मध्य रात्री १२ ते १५ नक्षल गावात दाखल झाले व सुरु असलेल्या कामाचा विरोध करत त्यांना कामावर लागलेल्या ४ वाहनांची जाळपोळ केली. सदर बांधकामाचे कंत्राट अहेरी येथील सतीश मुक्कावार यांचे असल्याचे वृत्त आहे.