रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणार्याविरुध्द मुख्याधिकार्यांकडे तक्रार

0
21

देसाईगंज,दि.१३ः-वारंवार सुचना देऊन ही दररोज भरत असलेल्या दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या मैदानात सकाळच्या गुजरीत मनमानी करुन बाजारपेठ कंत्राटदाराला न जुमानता मुख्य रस्त्यावर दुकान थाटुन वाहतूकीला अडथळा निर्माण करणाय्रा दुकानदारांवर कारवाई करण्याबाबत शॉपींग सेंटरधारकांनी देसाईगंज नगरपालिका मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांच्या कडे केली आहे.
देसाईगंज शहर हे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असुन मातावार्डातील दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या जागेवर दररोज आजुबाजुला शेतकरी शेतात काढत असलेल्या हिरव्या भाजीपाला ठोक दराने सकाळी सात ते साडे अकरा च्या सुमारापर्यंत विक्री केल्या जाते. या ठिकाणाहुन घेतलेला भाजीपाला आजुबाजुच्या ठिकाणी भरत असलेल्या आठवडी बाजारपेठ मध्ये विक्री केल्या जाते.
परंतु, देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये आलु, लसन, कांद्याचा व अद्रक संदर्भात स्वतंत्र बाजारपेठ असतांना देखील या ठिकाणचे काही व्यापारी दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या जागेवर आपला दुकान न थाटता, नगरपरीषद शॉपींग सेंटर बँकेकडे जाणाय्रा मुख्य वाहतूकीच्या मुख्यरस्त्यावर अतिक्रमण करून सकाळी सात वाजता पासुन दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूकीला अडथळा करतात. या परिसरातील जनतेला सकाळी विद्यार्थांना ने — आण करणार्या शाळेच्या बसेस व खाजगी वाहने काढताच येत नसल्याने अनेकदा लेखी व मौखिक तक्रारी केल्या.मनमानी करणार्या व्यापार्यांना वारंवार सुचना देऊनही काहीही सुधारण झालेली नाही.त्यामुळे नगर परिषद देसाईगंजच्यावतीने अतिक्रमण करणार्या व्यापार्यावर कायदेशिर कारवाई करुन वाहतूकीला निर्माण होत असलेला अडथळा दुर करुन परिसरातील जनतेला होणारा त्रास कमी करावा अशी मागणी नगरपरीषद शॉपींग सेंटरधारकांनी मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांच्या कडे केली आहे. यावर नगरपरीषद प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे  लागले आहे.