38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News काँग्रेसची नववी यादी जाहीर;अकोला पटेल,रामटेक गजभिये,चंद्रपूरातून धानोरकर लढणार

काँग्रेसची नववी यादी जाहीर;अकोला पटेल,रामटेक गजभिये,चंद्रपूरातून धानोरकर लढणार

0
31

blank

नवी दिल्ली,दि.24 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिनाडूच्या एकूण 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अकोलासाठी  हिदायद पटेल, रामटेक किशोर गजभिये, चंद्रपूर सुरेश धानोरकर, हिंगोली सुभाष वानखेडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पूत्र  कार्ती चिदंबरम यांना तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. बिहारमधील किशनगंजसाठी मोहद जावेद, कटीहारसाठी तारिक अन्वर, पुर्नियासाठी उदय सिंह यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर जम्मू काश्मीरच्या बारामुल्लासाठी हाजी फारूक मीर आणि कर्नाटकमधील बेंगळुरु दक्षिण मतदारसंघासाठी बी के हरिप्रसाद यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

blank