33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News दोन चिमुकल्या भावांचा जुगनाळा तलावात बुडून मृत्यू

दोन चिमुकल्या भावांचा जुगनाळा तलावात बुडून मृत्यू

0
32

ब्रह्मपुरी,दि.25: तालुक्यातील जुगनाळा येथील दोन चिमुकल्या भावंडाचा मुरुमासाठी खोदलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. स्पंदन जोतिबा मेश्राम (७) व आयुष जोतिबा मेश्राम (४) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही रविवारी दुपारी चार वाजता आईसोबत गवरला शिवारात असलेल्या शेतात गेले होते. आई शेतात काम करीत असताना दोघेही भाऊ लगतच असलेल्या तलावावर गेले. तलावात आधीच कुणीतरी मासोळ्या पकडण्यासाठी मच्छरदाणी टाकून ठेवली होती. हे भाऊ त्या मच्छरदाणीत अडकून जागीच मरण पावले. तिकडे त्यांच्या आईने दोन्ही मुले जवळपास दिसत नसल्याने ती घरी गेली असावीत असे समजून तीही घरी गेली. मात्र घरीही न दिसल्याने तिच्या काळजाचे ठोके वाढले. शोध घेत तलाव गाठले असता दोघांचेही मृतदेह जाळ््यात अडकलेले आढळून आले. या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

blank