लांजीचे माजी आमदार किशोर समरितेची नक्षल्यांनी जाळले वाहन

0
20
गोंदिया,दि.३०: शेजारील मध्यप्रदेश राज्यात चौथ्या टप्यातील बालाघाट लोकसभा मतदारसंघाकरीता २९ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून पहाटे ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान बालाघाट लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व लांजीचे माजी आमदार किशोर समरिते यांच्या वाहनाला अडवून नक्षल्यांनी आग लावल्याची घटना घडली.
सविस्तर असे की,समरिते हे लांजी विधानसभा मतदारसंघातील बिलालकसा येथून पहाटे लांजीकडे येण्यासाठी निघाले असता या मार्गावरील चौरीया गावाजवळील दुर्गा माता मंदीराजवळ अज्ञात १०-१८नक्षल्यांनी रस्ता अडविला.आणि वाहनातून उतरवताच नाव विचारुन वाहनाच्या पेट्रोल टँकला फोडून आग लावले त्यानंतर  १ ते दीड किलोमीटरपंर्यत त्यांना मागे न बघताच निघून जा अन्यथा गोळ्या मारणार अशी धमकी दिल्याचे समरिते यांनी पोलिसांना सांगितले.वाहनाला आग लावल्यानंतर आपण पायी पायी लांजीला सकाळी ५.३० वाजता पोचून सरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.या घटनेनंतर लांजी विधानसभा मतदारसंघात सशस्त्र दलाची तैनाती करुन बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.तर बालाघाट पोलिसांनी सर्चिग सुध्दा सुरु केले आहे.दरम्यान बालाघाट नक्षल विभागाशी संपर्क केले असता त्यांनी घटनेला दुजोरा देत १०-१८ पैकी काही वर्धीधारी असल्याचे सांगितले असून ते खरोखरच नक्षली होते की कोण याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली.