‘टॉप टेन’ खासदारांतही विदर्भ मागासला

0
6

मुंबई दि. २४ –- ‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले‘ याची प्रचिती राज्याच्या पाच खासदारांनी संसदेत केलेल्या कामगिरीवरून पुन्हा येते आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या वर्षात संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा खासदारांत महाराष्ट्राच्या पाच शिलेदारांनी बाजी मारली आहे. संपूर्ण देशातून “टॉप टेन‘मध्ये महाराष्ट्राच्या खासदारांची कामगिरी उजवी ठरल्याचे कौतुक होत आहे. मात्र, राज्यातून भारतीय जनता पक्षाचा एकही खासदार या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या रांगेत नसल्यामुळे आश्‍चर्यही व्यक्‍त होत आहे.विशेष म्हणजे टाप टेन खासदारातही विदर्भ मागासला राहिला आहे.यावरुन विदर्भ किती मागासला आहे की या भागातील खासदार आपली छाप सुध्दा संसदेत सोडू शकले नाही.गोंदिया-भंडाराचे खासदार हे फक्त टिव्हीवरील बातम्यामध्येच आघाडीवर राहिल्याचे चित्र राहिले.
मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त संसदेत महाराष्ट्राच्या खासदारांचा आवाज दुमदुमला आहे. खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आल्यानंतर पहिल्या दहा जणांमध्ये राज्यातल्या पाच खासदारांचा समावेश झाला आहे. यात शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर कॉंग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे.राज्यात राष्ट्रवादीचे चार, तर कॉंग्रेसचे केवळ दोनच खासदार निवडून आले आहेत. तर, शिवसेनेचे 18 आणि भाजपचे 23 खासदार आहेत. देशभरातल्या पहिल्या दहा खासदारांत पहिल्यांदाच खासदार झालेले शिवसेनेचे श्रीरंग बारणे, कॉंग्रेसचे राजीव सातव व राष्ट्रवादीचे धनंजय महाडीक यांनी बाजी मारली आहे.
दहा जणांमधे शिवसेनेचे श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, धनंजय महाडीक तर कॉंग्रेसचे राजीव सातव या खासदारांचा समावेश आहे. तर, इतर पाच जणांमध्ये इतर राज्यांतील पी. पी. चौधरी (भाजप), ध्रुव नारायण, रामचंद्र मुल्लापल्ली (कॉंग्रेस), पी. के. बिजू, एम. बी. राजेश (सीपीआयएम) या खासदारांचा समावेश आहे.