माओवाद्यांच्या बिहार-झारखंड बंदला हिंसक वळण

0
12

वृत्तसंस्था
रांची,-दि. २५- प्रतिबंधित नक्षली संघटना ‘भाकप’च्या माओवाद्यांकडून पुकारलेल्या दोन दिवसीय (सोमवार-मंगळवार) ‘बिहार-झारखंड’ बंदला हिंसक वळण लागले आहे. माओवाद्यांनी दोन्ही राज्यांत जाळपोळ सुरु केली आहे. आतापर्यंत त्यांनी 40 पेक्षा जास्त वाहने पेटवली आहेत. तसेच गया जिल्ह्याचे एसएसपीला लोकन्यायालयात शिक्षा देण्याची धमकीही दिली आहे.

माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरु करणारे एसएसपी मनु महाराज यांच्यासह सीआरपीएफचे साहाय्यक कमांडोजला लोकन्यायालयात शिक्षा देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, सीआरपीएफ, एसटीएफ आणि बिहार मिलिट्री पोलिसच्या (बीएमपी) कमांडोजनी नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरु केले आहे.

बिहारमध्ये 32 ट्रक खाक
बिहारमधील गया जिल्ह्यातील जीटी रोडवर उभे असलेले 32 ट्रक माओवाद्यांनी रविवारी रात्री पेटवले. यापूर्वी ठिकठिकाणी पोस्टर चिटकावून माओवाद्यांनी हल्ल्याची धकमी दिली होती. पोस्टरमध्ये गयाचे एसएसपी मनु महाराज, सीआरपीएफ कोबरा बटालियनचे कमांडेंट नीरज कुमार, कंपनी कमांडेंट ओमप्रकाश तिवारी आणि बाराचट्‌टीचे निरीक्षक रविप्रकाश सिंह यांना लोकन्यायालयात शिक्षा देण्याची धमकी देण्यात आली होती.

मनु महाराज यांनी सांगितले की, शेकडो माओवादी शस्त्रास्त्र घेऊन रविवारी रात्री जीटी रोडवर पोहोचले. त्यांनी अनेक ट्रक थांबवल्या आणि त्यांना पेटवून दिले. घटनेची दखल घेत सुरक्षा जवानांनी ‘सर्च ऑपरेशन’ ऑपरेशन सुरु केले आहे. या घटनेची चौकशी करण्‍यासाठी बिहारचे डीजीपी स्वत: घटनास्थळाची पाहाणी करणार आहे