26.8 C
Gondiā
Tuesday, July 7, 2026
Home Top News राज्यात कोरोनाची लागण झालेले पहिले कपल घरी पोहोचले

राज्यात कोरोनाची लागण झालेले पहिले कपल घरी पोहोचले

0
192

पुणे,दि.26 : कोरोना विषाणूच्या धास्तीने जगाला वेढले आहे. भारतही यातून सुटलेला नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण आढळले आणि पुणे-मुंबई हे त्याचे केंद्र ठरले. परंतु, अगदीच सारे नकारात्मक नाही. कारण, राज्यातील पहिले कोरोना पॉझिटिव्ह दांपत्य कोरोनामुक्त झाले असून त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. याशिवाय इतर तिघांचेही अहवाल निगेटिव्ह असून त्यांना आज गुरुवारी घरी पाठवले जाईल.

तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात सर्वात आधी सापडलेले 5 कोरोनाग्रस्त आता बरे झाले आहेत. त्या पाचही रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यांच्यात सातत्याने सुधारणा होत गेली. आता त्यांचे स्वॅब सॅम्पल चाचणीसाठी पाठवले असता पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापैकी दोन रुग्णांना गुढी पाडवाच्या निमित्ताने घरी पाठवले आहे. राज्यात कोरोनाची लागण सर्वप्रथम ज्यांना झाली होती, ते हेच कपल होते. तर उर्वरीत तीन जणांना आज गुरुवारी डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.