27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Top News उद्यापासून 30 रेल्वे सुरू, सर्व कोच एसी; दिल्लीहून 15 शहरे जोडणार

उद्यापासून 30 रेल्वे सुरू, सर्व कोच एसी; दिल्लीहून 15 शहरे जोडणार

0
423

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.11 : लॉकडाऊनमुळे देशभर अडकून पडलेल्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. रेल्वे १२ मेपासून हळूहळू सेवा सुरू करणार आहे. मंगळवारी विशेष सुविधेनुसार ३० राजधानी रेल्वे (१५ जोडी) सुरू होतील. आरक्षण सोमवारी सायंकाळी ४ पासून केवळ आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होईल. रेल्वे स्टेशन्सवर प्लॅटफॉर्म तिकिटासह सर्व बुकिंग काऊंटर बंद असतील. या रेल्वेत पँट्री असणार नाही. पॅक भोजन मिळेल. दिल्लीहून दिब्रुगड, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवानंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावीसाठी या रेल्वे असतील. रेल्वेच्या सूत्रांनुसार, कोरोना केअर सेंटरसाठी २० हजार बोगी राखीव आहेत. याशिवाय प्रवासी मजुरांसाठी रोज सुरू असलेल्या ३०० रेल्वे यापुढेही चालू राहतील. यानंतर उरलेल्या बोगींचा अंदाज घेऊन देशभर विशेष रेल्वेे चालवल्या जाणार आहेत.

कोविड-१९ साठी २० हजार डबे राखून ठेवल्यानंतर आणि स्थलांतरितांसाठी दररोज चालविण्यात येणाºया ३०० श्रमिक रेल्वेतील उपलब्ध डब्यांचा विचार करून नव्या मार्गांवर सेवा सुरू होईल. प्रवाशांनी मास्क वापरणे व निर्गमनाच्या (डिपार्चर) ठिकाणी स्क्रीनिंग करून घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-१९ ची स्पष्ट लक्षणे नसलेल्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल, असे रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक राजेश दत्त वाजपेयी यांनी निवेदनात म्हटले.आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकिटेया रेल्वेंच्या रिझर्व्हेशनसाठी बुकिंग ११ मे रोजी दुपारी ४ वाजेपासून सुरू होईल आणि ते आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरच  उपलब्ध असेल.रेल्वे स्थानकांवर तिकीट बुकिंग खिडक्या बंद राहतील आणि प्लॅटफॉर्म्स तिकिटासह कोणतेही तिकीट दिले जाणार नाही. ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकिटे असतील त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल