मुंबई.दि. 17 महाविकासआघाडी सरकारने राज्यातील लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवला आहे. आज लॉकडाउन तीन संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमिवर राज्य सरकारने आज अखेर लॉकडाउन वाढीची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात लॉकडाउन असूनही संक्रमितांच्या संख्येत विशेष घट होत नाहीये, त्यामुळे हा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होईल. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. दरम्यान, या लॉकडाउन चारमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. परंतू, रेड झोनमध्ये अधिक काळजी घेतली जाणार आहे.
- लॉकडाउनचे टप्पे
- लॉकडाऊन एक – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
- लॉकडाऊन दोन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
- लॉकडाऊन तीन- 4 मे ते 17 मे (14 दिवस)
- लॉकडाऊन चार- 18 मे ते 31 मे (14 दिवस)





