गोंदिया,दि.17ःमहिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया,उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून स्वयंसहाय्य महिला बचत गटांना रोजगार मिळावा या उद्देशाने कापडी पिशवी निर्मिती व मास्क तयार करण्यात येत आहेत.या उद्योगाची पाहणी स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी करीत गरीब गरजू महिलांना लॉकडाऊन दरम्यान रोजगार उपलब्ध होण्याकरिता विकास निधीतून निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले.महिला गटाच्या माध्यमातून १५००० कापडी मास्क तयार करून शहरी व ग्रामीण भागातील गरीब गरजू लोकांना वाटप केल्या जाणार आहे.यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे उपस्थित होते.यावेळी आमदार अग्रवालांच्या हस्ते पहांदी पारी कुपार लिंगो बहुदेशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. सविता बेदरकर यांना 100 कापडी मास्क देण्यात आले.





