26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News कोरोना रिकव्हरी प्रमाणात मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम,गोंदिया तेराव्या स्थानी

कोरोना रिकव्हरी प्रमाणात मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम,गोंदिया तेराव्या स्थानी

0
346

गोंदिया,दि.23ः- कोरोना आजारातून बरे होण्याच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट राज्य शासनाच्या आरोग्यसेवा संचालनालयाने जाहीर केला.त्यात महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट सध्या 49.5 टक्के एवढा आहे .तर देशाचा 52.7 टक्के इतका आहे.राज्यात कोल्हापूर जिल्हा पहिल्या स्थानावर आहे.तर गोंदिया जिल्हा 13 व्या स्थानावर असून रिकव्हरी प्रमाण 68.3 एवढा आहे.  कोल्हापूरचा रिकव्हरी रेट 90.4 इतका आहे. परभणी दुसऱ्या क्रमांकावर असून परभणी चा प्रमाण 87.5 आहे. तर, हिंगोली जिल्ह्याचे प्रमाण 84. 59 टक्के असल्याने हिंगोली तिसऱ्या स्थानावर आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ अर्चना पाटील यांनी यांनी ही माहिती जाहीर केली आहे.

जिल्हानिहाय प्रमाण जाहीर करण्यात आला आहे . केंद्र शासनाच्या नवीन डिस्चार्ज पॉलिसी नुसार व राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांनुसार सर्व रुग्णांच्या वर्गीकरणानुसार रुग्णांना वेळेवर डिस्चार्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.रुग्ण बरे होण्याचे प्रमाणात कोल्हापूर, परभणी, हिंगोली पाठोपाठ वर्धा 78.96, गडचिरोली 78, सिंधुदुर्ग 77.3, चंद्रपूर 75.9, अहमदनगर 74.6 उस्मानाबाद 73.9, बीड 69.9, सातारा 69.5, यवतमाळ 69 ,गोंदिया 68.3 ,रत्नागिरी 66.7, धुळे 65.8,भंडारा 65.9, बुलढाणा 65 लातूर 64.1,अकोला 63.5, जालना 63. 3 ,अमरावती 63, नागपूर 62.9, नांदेड 62.5 आहे. सर्वात कमी असलेली जिल्हे वाशिम,पालघर,नंदुरबार,ठाणे व सोलापूर हे आहेत.