जिल्हा विकास आराखडा बनविताना शाश्वत विकासावर भर द्यावा- जिल्हाधिकारी किशोर तावडे

0
2

सिंधुदुर्गनगरी दि 15  – आपल्या जिल्ह्याला मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा  पर्यटन जिल्हा असल्याने भविष्यात अनेक पर्यटन उपक्रम राबविने आवश्यक आहे.  जिल्हा विकास आराखड्याच्या माध्यमातून 2048 पर्यंतचे नियोजन करावे. हे नियोजन करत असताना जिल्ह्याची बलस्थाने ओळखून जिल्ह्याचा शाश्वत असा विकासात्मक आराखडा तयार करावा असे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले.

जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल खत्री, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार, समन्वयक तथा शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ.ज्ञानदेव तळुले तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या जिल्ह्यामध्ये सुमारे 49 समुद्र किनारे आहेत त्यातील सर्वच पर्यटकांना माहिती आहेत असे नाही म्हणून आपण त्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. या बाबीचा पर्यटन विकास आराखडा बनवताना विचार होणे आवश्यक आहे. एकदा जिल्ह्यात आलेला पर्यटक सिंधुदुर्ग, रत्नागिरी- कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये भ्रमंती कसा करेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे जेणेकरुन रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होईल . महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर पर्यंत घेऊन जायची आहे आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राला अग्रेसर बनवायचे आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व घटकांना यामध्ये समाविष्ट करुन जिल्ह्याचा शाश्वत विकास घडवूनआणायचा आहे.  प्रत्येक जिल्ह्याचा विकासात्मक आराखडा बनविण्यासाठी सर्व विभागांकडून माहिती गोळा केली जाणार आहे विशेष म्हणजे जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक सूचना देखील विभागप्रमुखांनी करावयाच्या असून प्रत्येक क्षेत्रासाठी कार्यकारी समिती बनविण्यात येणार आहे. या  जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने SWOT Analysis करुन  दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा, आराखड्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विविध टप्पे निश्चित करण्यात यावेत यात उद्दिष्ट्य,अर्थसंकल्पीय तरतूद, कामे पूर्ण होण्याची कालमर्यादा, निवडलेल्या प्रत्येकउपक्षेत्रासाठी धोरणात्मक सुधारणा, अशा बाबींचा समावेश अपेक्षीत आहे. या कृती आराखड्यातील बाबी केंद्र आणि राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमाशी जोडणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. तळुले म्हणाले,  विभागप्रमुखांनी कृषी, उद्योग, मत्स्य, फलोत्पादन, दुग्ध, पर्यटन, पशुसंवर्धन इ. विकासक्षेत्रामध्ये आराखडा तयार करताना जिल्ह्याचे एकत्रित उत्पादन कसे वाढवता येईल यादृष्टीनेमुल्य वृध्दीसाठी आवश्यक आराखडा सादर करावयाचा आहे, जिल्ह्यातील स्थानिक गरजा व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचासुयोग्य वापर करुन जिल्ह्याच्या विकासाला पोषक ठरेल असा विकास आराखडा तयारकरावयाचा आहे, हा  आराखडा तयार करतानाजिल्ह्यातील तज्ञ व्यक्ती, शैक्षणिक संस्था. प्रमुख भागधारक, संशोधन संस्थांमधीलप्राध्यापक तसेच विविध उद्योग, वित्तीय संघटनांच्याप्रतिनिधीशी विचारविनिमय करुन विभाग प्रमुख यांनी आराखडा तयार करावा, जिल्हा विकासआराखडा तयार करताना आजचे सकल जिल्हा उत्पन्न व त्यामध्ये पुढील पाच दहा, पंधरा वर्षांच्याकालावधीत अपेक्षित असलेली वाढ यावरही लक्ष्य केंद्रीत करण्यात यावे तसेच  या कृती आराखड्यात अंतर्भूत असणाऱ्या बाबीसुस्पष्ट, साध्य करण्यायोग्य, सुसंगत व कालबध्दअसाव्यात. त्याआधारे कृती कार्यक्रमाचे वर्गीकरण अल्प/मध्यम/दीर्घ मुदतीच्या बाबी याप्रमाणेकरण्यात यावे असेही ते म्हणाले.