नवरात्री काळात”निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे “अभियानातुन 18 वर्षावरील पुरुषांची तपासणी

0
12

गोंदिया,दि. 18 ऑक्टोंबर : सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात “आयुष्मान भव:” मोहीम दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर राबविण्यात येत आहे. मोहिमे दरम्यान “निरोगी आरोग्य तरुणाईचे ,वैभव महाराष्ट्राचे ” अभियानातुन 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम याचे सोबत विविध उपक्रमा अंतर्गत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश चार महिन्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी यावेळी दिली.
“निरोगी आरोग्य तरुणाईचे ,वैभव महाराष्ट्राचे ” अभियानातुन 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम जिल्हा भर राबविण्यास येत असुन साप्ताहीक आरोग्य मेळावे व विविध गावनिहाय तपासणी शिबीरा दरम्यान लोंकाची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी दिली आहे.
नवरात्री उत्सव काळात आरोग्य शिबीरातुन लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दि. 18 ऑक्टोंबर रोजी ईंगळे चौक, सिव्हील लाईन दुर्गा महोत्सव येथे छोटा गोंदिया च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तपासणी शिबिरा दरम्यान मधुमेह ,रक्तदाब, क्षयरोग, अंससर्गजन्य आजार, सिकलसेल, मानसिक आजार, ,कुष्ठरोग,संसर्गजन्य आजार या बाबत विविध आजाराबाबत तपासणी करण्यात आली तसेच पोषण आहार, टेलीकन्सलटेशन , ई- संजीवनी ओपीडी , लसीकरण, निक्षयमित्र ह्याबाबत प्रतिंबधात्मक जनजागृती करण्यात आली. तपासणी शिबीरादरम्यान वैद्यकिय अधिकारी डॉ. खुशाल बलपांडे, आरोग्य सेविका वर्षा बोरकर व सुलोचना रहांगडाले, आरोग्य सेवक आकाश निकुसे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राहुल दमाहे, परिचर महेंद्र वर्हाडे यांनी आरोग्य सेवा दिली.
आजारी पुरुषांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भीय करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील वय वर्ष 30 वरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, उपचार मोफत करण्यात येणार आहे. गरजेनुसार गंभीर आजारी रुग्णांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा अंगीकृत रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी दिली आहे.
सर्व अठरा वर्षावरील पुरुषांनी नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घेण्याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी आवाहन करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हयांतर्गत सर्व आरोग्य संस्थेत या ठिकाणी सर्वांगीण तपासणी केली जाणार आहे व उपचारही केला जाणार आहे.