किमान वेतन,दिवाळी बोनस, वेतनश्रेणी इत्यादीसाठी बेमुदत संप सुरू

0
3
भंडारा -:   महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या राज्यव्यापी आव्हानानुसार किमान वेतन दिवाळी बोनस वेतनश्रेणी, ऑनलाईन कामाची सक्ती  करूनये इत्यादी प्रश्नावर दिनांक 18 ऑक्टोबर पासून आशा व गटप्रवर्तकांचा संप सुरू झाला असून त्यानिमित्ताने जिल्हा परिषद भंडारा समोर आयटक प्रणित युनियनच्या वतीने  महाधरने आंदोलन करण्यात आले.
      आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष काॅ. शिवकुमार गणवीर,आयटकचे जिल्हा सचिव काॅ हिवराज उके, राजू बडोले आशिषा मेश्राम, सुनंदा दहिवले, भूमिका वंजारी इत्यादींनी केले.याप्रसंगी डीएचओच्या  अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.
      निवेदनात आशा स्वयंसेविकांना ऑनलाइन कामे करण्यासाठी होत असलेले सक्ती व दडपशाही त्वरित थांबवावी त्यांना दिवाळी बोनस द्यावा आशांना किमान वेतन लागू करावे,केंद्र शासनाकडून मोबदल्यात वाढ मिळवून द्यावी, गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावे. गटप्रवर्तकांना प्रवास खर्च वेगळा द्यावा गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामे सांगू नयेत इत्यादी मागण्या मंजूर व्हाव्यात याकरता आशा व गटप्रवर्तक दिनांक 18 पासून राज्यव्यापी संपावर जातील अशा आशयाची नोटीस दिनांक 2 ऑक्टोबर रोजी शासनाला देण्यात आली होती परंतु या मागणीकडे अजून पर्यंत शासनाने लक्ष दिले नाही.
       राज्यातील 70000 आशा स्वयंसेविका व 4000 गटप्रवर्तकांनी 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संप सुरू केलेला आहे.  जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेसमोर मार्गदर्शन करताना कॉ. शिवकुमार गणवीर तसेच काॅ. हिवराज उके यांनी केले.याप्रसंगी मोठ्या संख्येत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आंदोलनामध्ये सहभागी होते त्यात प्रामुख्याने लोभा सोनावणे साधना बडोले सविता नरनवरे शामकला कांबळे वनिता पंचबुद्धे लक्ष्मी निमजे मीना कुथे  वनिता निर्वाण, नंदा चवळे, निरू जांभुळकर इत्यादींच्या सहभाग होता.